फलटण (जिल्हा सातारा) येथील श्रीराम रथयात्रा प्रशासनाकडून रहित !
सातारा, ४ डिसेंबर (वार्ता.) – मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला फलटण (जिल्हा सातारा) येथील प्रसिद्ध मुधोजी मनमोहन राजवाड्याजवळील श्रीराम मंदिराची रथयात्रा निघते. यंदा ५ डिसेंबर या दिवशी ही रथयात्रा निघणार होती; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली असल्यामुळे रथयात्रा रहित करण्यात आली आहे, तसेच भाविकांनी रथयात्रा अथवा दर्शनासाठी फलटणच्या दिशेने येऊ नये, असे आदेश फलटण उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिले आहेत.
प्रांताधिकारी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे, श्रींचे धार्मिक विधी करण्यास अनुमती आहे, तसेच लसीकरण झालेल्या भाविकांनाच श्रींच्या दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. रथयात्रा रहित झाल्यामुळे भाविकांनी अनावश्यक गर्दी करू नये.