धर्माचरण करणारे आणि धर्मासाठी बाणेदारपणा दाखवणारे अमरावती येथील हिंदुत्वनिष्ठ पत्रकार श्री. अमोल खोडे !
श्री. अमोल खोडे हे नागपूर येथील दैनिक ‘नवभारत’चे अमरावती येथील उपसंपादक आहेत. प्रखर हिंदुत्वनिष्ठ पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. १३ नोव्हेंबर २०२१ या दिवशी अमरावती येथे ‘त्रिपुरा राज्यात मशिदी जाळल्या’, अशा अफवेमुळे अमरावती शहरात धर्मांधांनी मोर्चा काढून हिंदूंची दुकाने आणि दुचाकी वाहने जाळली. याच्या विरोधात दुसर्या दिवशी हिंदुत्वनिष्ठ पक्षांनी शहरात मोर्चा काढून निषेध नोंदवला. या दोन्ही दिवसांच्या घटनाक्रमाचे साक्षीदार पत्रकार श्री. खोडे होते; म्हणून हिंदु जनजागृती समितीने १७ नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेल्या ‘चर्चा हिंदु राष्ट्रकी’ या ऑनलाईन चर्चेत ‘महाराष्ट्र मे दंगे – रजा अकादमी का षड्यंत्र’ या विषयावर वक्ता म्हणून त्यांना आमंत्रित केले. त्यांनी चर्चासत्रात सत्यस्थिती मांडली. १४ ते १८ नोव्हेंबर या दंगलीच्या काळात अमरावतीत ‘इंटरनेट’ सेवा बंद होती. तरी श्री. अमोल शहरापासून १२ किलोमीटर अंतरावरील मारुति मंदिरात जाऊन चर्चासत्रात सहभागी झाले होते. त्यांच्यातील प्रखर हिंदुत्वाची ओळख वाचकांना पुढील लेखाद्वारे करून देत आहोत.
लहानपणी मुसलमानाने सलाम केल्यानंतरच्या प्रसंगावरून प्रतिदिन टिळा लावण्यास आरंभ करणारे धर्माभिमानी श्री. खोडे !
श्री. अमोल खोडे यांचे वडील एका मुसलमानाच्या उपाहारगृहात नोकरी करायचे. एक दिवस श्री. खोडे त्यांच्या वडिलांच्या उपाहारगृहात गेले होते आणि बाहेर उभे होते. त्यांचे वय तेव्हा १३ वर्षे होते. मुसलमानांचे उपाहारगृह असल्याने दोन मुसलमान दुकानात आले आणि त्यांनी श्री. खोडे यांना ‘ते मुसलमान आहेत’, असे समजून ‘अस्सलाम वालेकुम’ (तुम्ही ठीक रहा) असे म्हणून ‘सलाम’ केला. तेव्हा श्री. खोडे त्यांना म्हणाले, ‘‘मी मुसलमान नाही.’’ त्यावर चिडून त्यातील एक मुसलमान व्यक्ती म्हणाली, ‘‘ये हमे क्या मालूम ? तुम्हारे सरपे लिखा है क्या कि तुम हिंदु हो.’’ (आम्हाला कसे कळणार ? तुझ्या डोक्यावर लिहिले आहे का ? की तू हिंदु आहेस.) त्या दिवशीपासून श्री. खोडे यांनी निश्चय केला की, हिंदूंची ओळख म्हणून प्रतिदिन नियमितपणे कपाळावर कुंकवाचा टिळा लावीन. तेव्हापासून ते कपाळावर कुंकवाचा टिळा लावतात.
वाहिनीच्या मालकाने टिळा लावण्याविषयी आक्षेप घेतल्यावर नोकरी सोडणे आणि नंतर वाहिनीच्या प्रेक्षकसंख्येवर परिणाम झाल्याने खोडे यांना टिळा लावून वाहिनीवर बोलण्यास सांगणे
श्री. खोडे एका वृत्तवाहिनीवर निवेदकाची नोकरी करतांनाही टिळा लावून वार्तालाप करायचे. त्यांच्या टिळ्यावर त्या वाहिनीच्या एका धर्मांध विश्वस्ताने आक्षेप घेत सांगितले, ‘‘तू प्रेक्षकांना ठळक न दिसेल असा टिळा लावत जा.’’ त्यावर श्री. खोडे यांनी ते नाकारले आणि नोकरीवर जाणे बंद केले. वाहिनी बघणार्यांच्या संख्येवर परिणाम होऊ लागल्याने वाहिनीचे अन्य सदस्य श्री. खोडे यांना दोन दिवसांनंतर भेटायला आले आणि ‘टिळा लावून बोलत जा’, असे म्हणत नोकरीवर बोलावले.
कॉन्व्हेंट शाळेतील पालक मेळाव्यात बाणेदारपणे शिक्षकांना ‘मास्तर’ म्हणण्यामागील भावार्थ सांगणे
अमरावती शहरातील एका कॉन्व्हेंट शाळेमधील पालक मेळाव्याच्या कार्यक्रमाला श्री. खोडे पत्रकार म्हणून गेले होते. कार्यक्रमाच्या संचालकांनी त्यांना व्यासपिठावर बोलावून दोन शब्द सांगायची विनंती केली. श्री. खोडे त्यांच्या भाषणात म्हणाले, ‘‘तुम्ही तुमच्या शाळांमध्ये शिक्षकांना ‘फादर’, ‘मदर’, ‘मॅडम’ असे म्हणता; पण मी शिक्षकांना मास्तर म्हणतो. याचे कारण असे की, ‘मा’ म्हणजे आई आणि ‘स्तर’ म्हणजे पातळी. अर्थात ज्यांची पातळी आईसमान आहे, ते म्हणजे मास्तर ! या कारणासाठी मी माझ्या कन्येला हिंदूंच्या शाळेत घातले आहे.’’ एवढे बोलून श्री. खोडे व्यासपिठावरून उतरले.
– श्री. नीलेश टवलारे, अमरावती.