नगर जिल्ह्यात आतापर्यंत ९०० कोटी रुपये महसूल जमा ! – राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती
नगर – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी ऑक्टोंबर २०२१ पर्यंत अवैध आणि बनावट दारू तयार करणार्यांवर धाड घातली. यामध्ये ९६२ गुन्हे नोंद करून ८३० आरोपींवर कारवाई केली. यातून वर्षभरात ८९९.४७ कोटी रुपयांचा महसूल जमा केला, तर ३ कोटी ३७ लाख रुपयांचा माल शासनाधीन केला आहे. जिल्ह्यात काही साखर कारखान्यांचे अल्कोहोल (दारू) निर्मिती प्रकल्प आहेत. त्यातून उत्पादन शुल्क अधिक प्रमाणात जमा होते. अवैध दारूविक्री, तसेच विविध कारवायांच्या माध्यमांतून जिल्ह्यात कर आणि दंड स्वरूपात अधिक प्रमाणात वसुली होऊ शकली. गोवा राज्यातून स्वस्त दरात आणलेल्या दारूची अन्यत्र विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत, अशा कारवाईमधून मोठ्या प्रमाणात वसुली होत आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी सांगितले.