जयेश साळगांवकर यांचा त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
पणजी, ३ डिसेंबर (वार्ता.) – गोवा फॉरवर्ड पक्षाचे माजी आमदार जयेश साळगांवकर यांनी ३ डिसेंबरला त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. पणजी येथे झालेल्या या समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि पक्षातील इतर नेते उपस्थित होते. ३ डिसेंबरला त्यांनी गोवा फारवर्ड पक्षाचे त्यागपत्र दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत साळगाव मतदारसंघातून त्यांना उमदेवारी मिळण्याची शक्यता आहे.
रविवारपर्यंत फोंड्याचे काँग्रेसचे आमदार रवि नाईक हेही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांचे दोन पुत्र रितेश आणि रॉय यांनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.