परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘पूर्वी एकदा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी गेले होते. तेव्हा देवाने मला विचार दिला, ‘दुसर्या दिवशी परात्पर गुरुदेवांचा सत्संग मिळणार आहे.’ त्यानंतर खरेखरच ‘त्यांचा सत्संग मिळणार आहे’, हे कळल्यावर मला आनंद झाला. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
१. परात्पर गुरुदेवांनी माझी विचारपूस केली आणि मी विचारलेल्या साधनेविषयीच्या प्रश्नांची उत्तरे दिली. तेव्हा ‘साक्षात् विष्णुस्वरूप गुरुमाऊली माझ्या साधनेसाठी किती वेळ देत आहे !’, असा विचार येऊन मला कृतज्ञता वाटत होती.
२. परात्पर गुरुदेव भेटल्यापासून माझा नामजप आतून होत होता. माझ्या मनातले सर्व अनावश्यक विचार नाहीसे होऊन माझे मन शांत आणि निर्विचार झाले.
३. ‘एकेक साधक घडावा’, यासाठी परात्पर गुरुदेव किती कष्ट घेत आहेत, साधकांना किती ऊर्जा पुरवत आहेत !’, असा विचार माझ्या मनात आला; पण ‘त्या तुलनेत माझ्याकडून साधनेसाठी अत्यल्प प्रयत्न होतात; किंबहुना ‘परात्पर गुरुदेवांचा सत्संग मिळावा’, यासाठी माझी पात्रताच नाही,’ असे मला वाटले.
४. ‘परात्पर गुरुदेव साधकांशी साधनेबद्दल सकारात्मक बोलून त्यांना प्रयत्न करण्यासाठी उत्साही करतात. इथून पुढे हा सत्संग स्मरणात ठेवून व्यष्टी साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करूया,’ असे मला वाटले.
५. परात्पर गुरुदेवांकडे पाहून माझी भावजागृती होत होती. ‘आपण वेगळ्याच विश्वात आहोत’, असे मला वाटत होते.
६. सत्संगात येण्यापूर्वी माझ्या अनाहतचक्रावर दाब जाणवत होता, तसेच स्वतःभोवती त्रासदायक शक्तीचे आवरण आल्यासारखे वाटत होते. सत्संगात मला आध्यात्मिक लाभ झाल्याने माझ्या अनाहतचक्रावरील दाब नाहीसा होऊन मला हलके वाटायला लागले.
‘हे गुरुमाऊली, ‘आपण माझ्यावर करत असलेल्या उपकारांची जाणीव मला सतत असू दे आणि त्याच जाणिवेने आपल्याला अपेक्षित असलेले साधनेचे प्रयत्न माझ्याकडून होऊ दे’, हीच आर्तभावाने प्रार्थना आहे.’
– एक साधिका
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |