अवकाळी पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील ८ सहस्र एकर क्षेत्रातील द्राक्षबागांची हानी !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – पंढरपूर तालुक्यात अवकाळी पाऊस पडल्याने द्राक्ष, डाळींब बागांसह रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळीमुळे तालुक्यातील ८ सहस्र एकर भूमीवरील द्राक्षबागांची हानी होत असून डाळींब बागांचीही मोठी हानी झाली आहे. संततधार पावसामुळे तालुक्यातील ऊसतोड बंद झाली असल्याने कारखान्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेवरही परिणाम झाला आहे. सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना हानीभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
सततच्या हवामानाच्या पालटामुळे द्राक्ष, डाळींब, केळी, सीताफळ, पेरू यांसह अन्य फळबागा आणि भाजीपाल्याच्या शेतीची हानी होत आहे. सलग ८ घंट्यांहून अधिक काळ पाऊस झाल्याने द्राक्षाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.