आध्यात्मिक त्रासांवर हास्यास्पद आणि वरवरच्या उपाययोजना करणारी निधर्मी लोकशाहीतील प्रशासकीय व्यवस्था !
पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार
‘धर्मप्रसार करण्यासाठी भारतभर चारचाकी वाहनांतून प्रवास करतांना मला ठिकठिकाणी रस्त्यांवर ‘अपघातप्रवण क्षेत्र – कृपया वाहने सावकाश चालवा !’, असे बर्याच ठिकाणी लिहिलेले दिसले. जिज्ञासा म्हणून मी तेथील स्थानिक वाहनचालकांना विचारते, ‘‘असे लिहिल्याने येथे अपघात होत नाहीत का?’’ तेव्हा ते वाहनचालक सांगतात, ‘‘असे लिहूनही या मार्गावर आणि विशिष्ट जागेच्या आसपास अपघात होत असतात.’’
खरेतर अशी अपघातग्रस्त ठिकाणे सूक्ष्म-जगतातील वाईट शक्तींद्वारे (भूत-पिशाच आदींद्वारे) प्रभावित असतात. त्यामुळे त्या भागात किंवा विशिष्ट ठिकाणी अपघात होतात. यासाठी अशी ठिकाणे अध्यात्मातील जाणकारांना दाखवून त्या ठिकाणांची शुद्धी किंवा सुरक्षाकवच निर्माण करण्यासाठी नामजपादी उपाय करावेत; मात्र आपली निधर्मी प्रशासकीय व्यवस्था सूक्ष्म-जगतावर अजिबात विश्वास ठेवत नाही. अशा परिस्थितीत प्रशासन बुद्धीने एखादे बोधवाक्य लिहून आपली सुटका करून घेते. अशा ठिकाणी वाहनचालकाला सावध करण्यासाठी जरी काही वाक्ये लिहिली, तरी वाईट शक्ती अतिशय हुशार असतात. त्या अशा ठिकाणांच्या अर्धा किलोमीटर आधीपासूनच चालकाला भ्रमित करतात. त्यामुळे दक्षतेसाठी माहितीचे फलक लावूनही अपघात होतच रहातात.’
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापक, वैदिक उपासनापीठ
(२०.११.२०२१)
|