श्रीरामजन्मभूमीचा निर्णय माझा नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचा ! – माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई
निर्णय धर्माच्या आधारे नव्हे, तर कायद्यांच्या आधारे घेण्यात आल्याचे सूतोवाच
वाराणसी (उत्तरप्रदेश) – श्रीरामजन्मभूमीविषयीचा निर्णय माझा नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी येथे दिले. ते एका कार्यक्रमात बोलत होते. रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पिठाने श्रीरामजन्मभूमीविषयी निर्णय दिला होता.
रंजन गोगोई पुढे म्हणाले की, हा निर्णय धर्माच्या आधारे नव्हे, तर कायद्यांच्या आधारे घेण्यात आला होता. न्यायाधिशांना कोणताही धर्म, जात आणि भाषा नसते. राज्यघटना हीच त्यांचा धर्म, जात आणि भाषा असते.