बांगलादेशातील हिंदूंच्या मंदिरांतील देवतांच्या फोडण्यात आलेल्या मूर्तींची छायाचित्रे ट्विटरवर प्रसारित केल्याने कोलकाता पोलिसांकडून हिंदु वापरकर्त्याला नोटीस !
बांगलादेशचे सरकार नव्हे, तर बंगालमधील कोलकाता पोलीस याविषयी एका हिंदुला नोटीस देतात, हे संतापजनक ! बंगालमधील तृणमूल काँग्रेस बंगालमध्ये सत्तेत आहे कि बांगलादेशमध्ये ? – संपादक
कोलकाता (बंगाल) – बांगलादेशामध्ये हिंदूंच्या मंदिरांतील देवतांच्या फोडण्यात आलेल्या मूर्तींची छायाचित्रे ट्वीट केल्यावरून कोलकाता पोलिसांनी बंगालमधील सिन्हा नावाच्या ट्विटर वापरकर्त्याला नोटीस बजावली. या छायाचित्रासमवेत सिन्हा यांनी लिहिले होते, ‘असे तेव्हा होते, तेव्हा हिंदु अल्पसंख्यांक असतात.’ सिन्हा यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश कोलकाताच्या साहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिला आहे. ९ ऑगस्टला भारतातील काही दैनिकांनी बांगलादेशातील मंदिरांवर आक्रमण झाल्याची वृत्ते प्रसिद्ध केली होती. त्या वृत्तांमध्ये मूर्तींच्या तोडफोडीची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली होती. हीच छायाचित्रे सिन्हा यांनी प्रसारित केली होती.