संतांप्रती मनात अपार भाव असणारी आणि परिपूर्ण सेवा करणारी ५८ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी कु. मृण्मयी दीपक जोशी (वय ११ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. मृण्मयी दीपक जोशी ही या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१८ मध्ये ‘कु. मृण्मयी दीपक जोशी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५४ टक्के पातळीची’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२१ मध्ये तिची पातळी ५८ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. मृण्मयी जोशी

१. आवड-नावड नसणे

‘तिच्या खाण्या-पिण्याच्या आवडी नसतात.

२. परिस्थिती स्वीकारणे

कोरोनामुळे असणार्‍या दळणवळण बंदीमुळे तिला अनुमाने २ वर्षे देवद आश्रमात जाता आले नाही. त्याचे तिला पुष्कळ वाईट वाटायचे. नंतर तिने ही परिस्थिती सहजपणे स्वीकारली. लहानपणापासूनच तिने कधी कशाचा हट्ट केलेला नाही. प्रत्येक परिस्थितीत ती जुळवून घेते.

३. अन्यायाविषयी चीड

सौ. शिल्पा जोशी

तिच्या मनात अन्यायाविषयी पुष्कळ चीड आहे.’

– सौ. शिल्पा दीपक जोशी (कु. मृण्मयीची आई), देवद, पनवेल

४. इतरांचा विचार करणे

‘मी दिवाळीसाठी मुलीकडे (सौ. शिल्पा दीपक जोशी हिच्याकडे) गेले होते. त्या वेळी मी आजारी असल्यामुळे कु. मृण्मयीने मला लागणारी सर्व औषधे पलंगावर व्यवस्थित लावून ठेवली होती. यामागे ‘आजीला काहीही आवश्यकता भासल्यास अन्य कुणाला हाक मारण्याची तिला आवश्यकता रहायला नको. तीच तिच्या गोष्टी घेऊ शकेल’, असा तिचा विचार होता. मध्यंतरी तिची आईही आजारी होती. तेव्हा आईचे खाणे-पिणे, औषध देणे इकडे तिने स्वतः लक्ष घातले. स्वतःला त्रास होत असतांना कुणालाही त्रास होत असेल, तर ती स्वतःचा त्रास विसरून दुसर्‍याला साहाय्य करते.

५. परिपूर्ण सेवा करणे

तिला घरातील कोणतेही काम सांगितले, तर ती ते अचूक करते. ते काम परत करावे लागत नाही. यामुळे मृण्मयीला कुठलेही काम सांगितले असेल आणि ती ते ‘करते’ म्हणाली, तर समोरची व्यक्ती पूर्ण निश्चिंत होते. लहान वयात ती अशा परिपूर्ण कृती करत असल्याने तिचे कौतुक वाटते.

६. समजूतदारपणा

मृण्मयी वयाच्या मानाने पुष्कळ समजूतदार आहे. तिला लहान मुले पुष्कळ आवडतात. कोरोना काळाच्या आधी ती देवद आश्रमात येत असे. तेव्हा बालसाधिकांना एकत्र करून आणि त्यांना समजून घेऊन ती त्यांच्या समवेत खेळत असे. त्यामुळे त्या ‘मृण्मयीताई’ म्हणून नेहमी तिच्यामागे असायच्या. ती कुणाविषयीच मनात राग धरत नाही. लगेच समोरच्याला क्षमा करते.

७. शिकण्याची वृत्ती

तिच्या आईने तिला ‘नामजप कसा शोधायचा ?’, हे शिकवले. ते ती पटकन शिकली.

८. परात्पर गुरु पांडे महाराज कौतुक करत असणे

लहानपणापासून ती देवद आश्रमात जायची. तिचे परात्पर गुरु पांडे महाराज पुष्कळ कौतुक करत असत. परात्पर गुरु पांडे महाराज यांनीच तिचे ‘मृण्मयी’ हे नाव ठेवले आहे.

९. मृण्मयीची अंतर्मनातून साधना चालू असल्याचे जाणवते.

१०. चुकांविषयी संवेदनशील असणे

डॉ. दीपक जोशी

अ. तिच्याकडून झालेल्या चुका ती वहीत लगेच लिहून ठेवते.’

– सौ. संध्या डोंगरे (कु. मृण्मयीची आजी, आईची आई), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

आ. ‘एकदा मृण्मयीचा घरात कुणाशी तरी वाद झाला. त्या वेळी मी त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा ती मला तत्परतेने म्हणाली, ‘‘मामा, मला या प्रसंगावर स्वयंसूचना बनवून दे.’’ सध्या ती रामनाथी आश्रमात आली आहे. येथेही तिच्या बोलण्यातून तिला चुका सुधारून स्वतःमध्ये पालट करण्याची तळमळ दिसून येते.’

– श्री. विक्रम डोंगरे (कु. मृण्मयीचा मामा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

११. बिंदूदाबनाचे कौशल्य

‘बिंदूदाबन उपचारपद्धतीच्या अंतर्गत मृण्मयी बिंदू दाबतांना दुखणारा बिंदू बरोबर पकडते. त्यामुळे ‘अल्प कालावधीत दुखणे अल्प होते’, असा अनुभव मला अनेक वेळा आला आहे.’

– डॉ. दीपक जोशी (कु. मृण्मयीचे वडील), देवद, पनवेल. ०

(सर्व सूत्रांचा दिनांक २८.११.२०२१)

चुकांच्या मुळाशी जाणारी प्रगल्भ मृण्मयी !

‘यंदाच्या दिवाळीसाठी मी आणि पत्नी सौ. संध्या डोंगरे आमच्या जावयाकडे (डॉ. दीपक जोशी यांच्याकडे) रहायला गेलो होतो. तेथे जातांना मी आश्रमातील फलकावर लावलेला माझ्या चुकांचा कागद नेला होता. तो मी सहज चि. मृण्मयीला दाखवला. तिने तो पूर्ण वाचला आणि नंतर एकेका चुकीच्या संदर्भात मी लिहिलेले स्वभावदोष आणि त्यांच्या जोडीला माझे आणखी कोणते स्वभावदोष असू शकतात, याविषयी तिने माझ्याशी चर्चा केली. माझ्याजवळ अन्य चुकांचे कागदही असल्याचे तिला सांगितल्यावर तिने ते सर्व कागद दाखवण्याची विनंती केली.’
– श्री. अरुण डोंगरे (कु. मृण्मयीचे आजोबा, आईचे वडील), सनातन आश्रम, देवद, पनवेल.


परात्पर गुरु डॉक्टर आणि संत यांच्याप्रती पुष्कळ भाव असणारी कु. मृण्मयी जोशी !

१. ‘मृण्मयीमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांविषयी पुष्कळ भाव आहे.

२. आता रामनाथी आश्रमात आल्यावर तिला एका संतांच्या खोलीत जाण्याची संधी मिळाली. तेथून परत आल्यावर ती निवासाच्या खोलीत आली आणि तिच्या आईच्या गळ्यात पडून रडू लागली. क्षणभर आम्हाला कळेना की, ‘ती का रडत आहे ?’ नंतर ती म्हणाली, ‘‘मला संतांनी जवळ घेतले.’’ तिचे बोलणे ऐकून आम्हा सर्वांचा भाव जागृत झाला. या प्रसंगातून तिचा संतांप्रती पुष्कळ भाव असल्याचे जाणवले.’

– श्री. विक्रम डोंगरे (कु. मृण्मयीचा मामा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

साधना आणि आश्रम यांचे महत्त्व ज्ञात असणारी कु. मृण्मयी जोशी !

‘रामनाथी आश्रमात आल्यावर कु. मृण्मयी दैवी बालकांच्या सत्संगाला बसायला लागली. १ – २ दिवसांतच ती मला म्हणाली, ‘‘बाबा, तुम्ही आणि आई घरी गेलात, तरी मी काही दिवस रामनाथी आश्रमात राहीन. त्यानंतर घरी येईन.’’

– डॉ. दीपक जोशी (कु. मृण्मयीचे वडील), देवद, पनवेल.


बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या  goo.gl/06MJck  मार्गिकेवरही पाहू शकता.


• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक