अरुणा धरणातून आज पाणी सोडण्यात येणार असल्याने सावधानतेची चेतावणी
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – वैभववाडी तालुक्यातील अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पात (अरुणा धरणात) पाणीसाठा करण्यात आला आहे. वर्ष २०२१-२२ च्या हंगामात धरणाचे उर्वरित काम करण्याकरिता साठा करण्यात आलेले पाणी सिंचन विमोचकाद्वारे येथील नदीच्या पात्रात ३ डिसेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीच्या पात्रातील पाण्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ, शेतकरी यांनी नदीच्या पात्रात उतरू नये, तसेच याविषयी सतर्कता बाळगावी, असे आवाहन मध्यम पाटबंधारे प्रकल्प विभागीय पथक, आंबडपालचे कार्यकारी अभियंता ह.ग. लवंगारे यांनी केले आहे.