परराज्यातून येणार्यांसाठी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी अनिवार्य ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
मुंबई – परराज्यातून महाराष्ट्रामध्ये येणार्या लोकांनी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करणे अनिवार्य आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. ‘केंद्र आणि राज्य सरकारांच्या नियमावलीतील तफावत दूर केली आहे. केंद्र शासनासमवेत चर्चा करूनच आता नवीन नियमावली येईल. ‘ओमिक्रॉन’विषयी आपण अधिक काळजी घ्यायला हवी. शाळांविषयी मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. सर्वत्र सारखे नियम असावेत, यासाठी लवकरच मुख्यमंत्री निर्णय घोषित करतील’, असे अजित पवार यांनी सांगितले.