रझा अकादमी, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांसारख्या संघटनांवर बंदी घाला ! – भाजपचे खासदार मनोज कोटक यांची लोकसभेत मागणी
नवी देहली – महाराष्ट्रात काही आठवड्यांपूर्वी धर्मांधांनी केलेल्या हिंसचारावरून रझा अकादमी, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांसारख्या संघटनांवर बंदी घालावी, अशी मागणी मुंबईतील भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी लोकसभेत केली.
महाराष्ट्र के अमरावती, नांदेड़ में त्रिपुरा की झूठी अफवाह की आड़ में हिन्दू को लक्ष्य कर हिंसा फैलाई गई । संसद में सदन से पुलिस और राज्य की संदिग्ध भूमिका की जांच की मांग की और “Raza Academy और PFI” जैसी देश विरोधी संस्था को बैन करने का प्रस्ताव दिया। pic.twitter.com/kYkerxBpfm
— Manoj Kotak (@manoj_kotak) December 1, 2021
कोटक पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड, मालेगाव आदी शहरांमध्ये जाणीपूर्वक कट रचून व्यापारी आणि हिंदू यांच्या घरांवर आक्रमणे करण्यात आली. त्रिपुरामध्ये मशिदीवरील आक्रमणाची खोटी बातमी पसरवून हिंदूंना लक्ष्य करत हिंसा करण्यात आली. दुसरीकडे पोलीस केवळ हिंदूंवर कारवाई करत आहेत.