पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ३ पशूवधगृहांवर कारवाई : १३१ वासरांची सुटका !
• १३ टन मांस जप्त • ८ धर्मांधावर गुन्हा नोंद ! |
धर्मांधांवर गुन्हा नोंद करून न थांबता त्यांच्यावर कठोर कारवाई होणेच आवश्यक आहे !
पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर), २ डिसेंबर (वार्ता.) – पेठवडगाव येथील ३ पशूवधगृहांवर पोलिसांनी कारवाई करत १३ टन मांस जप्त केले. याखेरीज ७९ सहस्र रुपयांची जनावरांची वाळलेली कातडी आणि १३१ जिवंत वासरे, असा एकूण ६ लाख ५६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी इस्माईल बेपारी, शौकत बेपारी, अल्पा बेपारी, मुस्ताक बेपारी, शफिक बेपारी, हुसेन बेपारी, इरफान बेपारी आणि खैय्याज बेपारी या धर्मांधांसह शेखर पोळ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
१. येथील बेपारी वसाहतीत अवैधरित्या मांसविक्री केली जात असल्याची माहिती मुंबईतील यतेंद्र कांतीलाल जैन यांना मिळाली. याची निश्चिती करून त्यांनी ही माहिती ‘पशूकल्याण सेवा समिती’ आणि ‘ध्यान फाऊंडेशन’चे आशिष बारीक यांना कळवली आणि ती त्यांनी पोलिसांना दिली. (जी माहिती मुंबईतील गोप्रेमींना मिळते, ती स्थानिक पोलिसांना कशी मिळत नाही ? कि मिळूनही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात ? – संपादक)
२. यानंतर पोलिसांनी २९ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजता बेपारी गल्लीत पहाणी केली असता मोठ्या प्रमाणात मांस आणि जिवंत वासरे आढळून आली. या जिवंत वासरांना सध्या निमशिरगाव येथील गोतज्ञ श्री. नितेश ओझा यांच्या ‘वेद खिल्लार’ गोशाळेत ठेवण्यात आले आहे. यातील काही गोवंशांची हाडे तुटली असून लवकरात लवकर त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.
३. या गोरक्षणासाठी आशिष बारीक यांच्यासह प्रतीक ननावरे, सचिन झुंझारराव, अधिवक्ता राजीव गुप्ता, जतीन शहा, राजूभाई शहा, महावीर भन्साळी, सांगली येथील गोरक्षक श्री. अंकुश गोडसे, श्री. प्रमोद गोडसे यांच्यासह अन्य प्राणीप्रेमींनी पुढाकार घेतला. प.पू. आचार्य अभयशेखर महाराज यांचे शिष्य प.पू. जयभानुशेखर महाराज यांनी गोशाळेला भेट देऊन मार्गदर्शन केले.
४. ‘ही माहिती मुंबईतून येते आणि त्यानंतर पोलीस कारवाई करतात; मात्र पेठवडगाव येथे इतक्या मोठ्या प्रमाणात अवैधरित्या हत्येसाठी पशूधन येऊनही त्याविषयी स्थानिक प्रशासन अथवा पोलीस यांपैकी कुणालाच कशी माहिती नाही ?’ याविषयी नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
आवाहन !सोडवलेल्या गोवंशांना दूध आणि चारा देण्यासाठी सहकार्य करा ! – श्री. सुभाष शहा, सांगलीया संदर्भात सांगली येथील ‘अमिझरा पार्श्वनाथ देहरासर’चे अध्यक्ष श्री. सुभाष शहा म्हणाले, ‘‘सोडवलेल्या गोवंशांमध्ये अनेक गोवंश हे ५ ते १५ दिवसांचे आहेत. त्यांना दुधाची आवश्यकता आहे. याखेरीज अन्य गोवंशांना चार्याची आवश्यकता आहे. यासाठी ज्यांना साहाय्य करायचे आहे, त्यांनी ९८२३३ ११२८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.’’ |