पूर्वीचे सात्त्विक राजे आणि आजचे तामसिक शासनकर्ते यांच्यामध्ये असलेले त्यांना झालेल्या शिक्षेच्या संदर्भात निरनिराळे दृष्टिकोन !
पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार
‘पापाची तीव्रता नष्ट करण्यासाठी किंवा न्यून करण्यासाठी कायद्यानुसार शिक्षा दिली जाते. जो कोणी शासनकर्ता, नेता किंवा प्रशासक सार्वजनिक किंवा राष्ट्रासाठी कार्य करतांना त्याच्याकडून झालेल्या चुकांची स्वीकृती देत नाही, तरी त्याला न्यायालयाकडून शिक्षा केली जाते. ही शिक्षा भोगल्यामुळे त्याच्याकडून झालेल्या पापी कृत्यांचे फळ न्यून होते आणि त्याला त्याच्या पापांचे परिणाम तुलनेने अल्प प्रमाणात भोगावे लागतात. धर्मशिक्षणाच्या अभावी हे साधे तत्त्व आजच्या नेत्यांना ठाऊक नाही; म्हणूनच कारागृहात गेल्यानंतर ते स्वतःच्या आजाराचे कारण सांगून रुग्णालयात भरती होतात. अशा बहिर्मुख राजकारण्यांना ना इथल्या कायद्याची भीती वाटते (नाहीतर त्यांनी भ्रष्टाचार केलाच नसता), ना ते देवाच्या कायद्याला घाबरतात. पूर्वीच्या काळी राजाने कोणतेही पाप केले असेल आणि ते जरी कुणी पाहिले नसेल, तरीही तो राजा आपल्या राज्याचे दायित्व सोडून प्रायश्चित्त घेण्यासाठी जंगलात जात असे; मात्र आजचे शासनकर्ते आपला गुन्हा पुराव्यानिशी सिद्ध होऊनही स्वतःचे पाप स्वीकारत नाहीत. हाच फरक पूर्वीचे सात्त्विक राजे आणि आजचे तामसिक शासनकर्ते यांच्यामध्ये आहे. हिंदु राष्ट्रात असे बहिर्मुख आणि तमोगुणी शासनकर्ते नसतील !’
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापक, वैदिक उपासनापीठ (२१.११.२०२१)