राज्याच्या मुख्य सचिवपदी देबाशीष चक्रवर्ती यांची नियुक्ती !
मुंबई – राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीताराम कुंटे यांनी देबाशीष चक्रवर्ती यांच्याकडे पदभार सोपवला आहे. देबाशीष चक्रवर्ती यांना ३ मासांचा कार्यकाळ मिळणार आहे. चक्रवर्ती फेब्रुवारी २०२२ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.