रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या विष्णुयागाच्या वेळी साधिकेला आलेली अनुभूती

सौ. पल्लवी हंबर्डे

श्रीसत्‌शक्ति  (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ श्रीविष्णूला अभिषेक करत असतांना तेथे ‘श्रीविष्णूच्या रूपात परात्पर गुरु डॉ. आठवले असून त्या त्यांनाच अभिषेक करत आहेत’, असे दिसणे, त्या वेळी ते दोघेही ध्यानावस्थेत असल्याचे जाणवणे : ‘श्रीविष्णुयागाच्या वेळी प्रारंभी पूजा करतांना ‘साक्षात् महाविष्णुच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) तेथे असून त्याच्याकडून येत असलेले चैतन्य वातावरणात पसरत आहे’, असे मला वाटले. त्या वेळी मनालाही वेगळाच आनंद जाणवत होता. श्रीसत्‌शक्ति  (सौ.) बिंदाताई श्रीविष्णूला अभिषेक करत असतांना तेथे ‘श्रीविष्णूच्या रूपात परात्पर गुरुदेव असून त्या त्यांनाच अभिषेक करत आहेत’, असे मला दिसत होते. ‘हा पुष्कळ मोठा सोहळा चालू असून त्या सोहळ्यात साक्षात् महालक्ष्मी परात्पर गुरुदेवांना अभिषेक करत आहे’, असे दृश्य मला दिसले. अभिषेक चालू असतांना ‘श्रीसत्‌शक्ति  (सौ.) बिंदाताई आणि परात्पर गुरुदेव ध्यानावस्थेत आहेत’, असेही मला जाणवले. अभिषेकास आरंभ झाल्यानंतर माझ्या आनंदात वाढ झाली. ‘परात्पर गुरुदेवांकडून पुष्कळ प्रमाणात चैतन्य येत असून ते सर्व साधकांना मिळत आहे’, असे जाणवले. शेवटी आरती करतांना मला स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते. ‘केवळ परात्पर गुरुदेवांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त होऊन त्यांच्या चरणी पुष्प अर्पण होत आहे’, असे मला जाणवले.

– सौ. पल्लवी हंबर्डे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२१.९.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक