स्वत:च्या पक्षाशी एकनिष्ठ न रहाणारे स्वार्थी नेते समाज आणि राष्ट्र यांच्याप्रती एकनिष्ठ काय रहाणार ?
पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार
‘लोकशाहीचे विकृत रूप तेव्हा दिसून येते, जेव्हा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून लोकसभा किंवा विधानसभा यांच्या उमेदवारांची सूची घोषित केली जाते. स्वत:च्या पसंतीचा मतदारसंघ न मिळाल्यास किंवा उमेदवार म्हणून नाव घोषित न झाल्यास हे स्वार्थी आणि सत्ताप्रेमी नेते आपल्याच नेतृत्वाच्या विरोधात किंवा पक्षाच्या विरोधात आपला विरोध व्यक्त करू लागतात. जो स्वत:च्या पक्षाशी एकनिष्ठ नसेल, तो समाज आणि राष्ट्र यांच्याप्रती एकनिष्ठ काय रहाणार ? अशा स्वार्थी नेत्यांकडून समाज आणि राष्ट्र यांचा उत्कर्ष कधीतरी साधला जाईल का ? सत्तेत राहूनही राष्ट्र आणि समाज यांची सेवा करता येते, हे साधे सत्य आजचे राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना शिकवू शकत नाहीत, ते कधी राजधर्माचे पालन करू शकतील का ?’
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापक, वैदिक उपासनापीठ (२१.११.२०२१)