कोकणासह मध्य महाराष्ट्रात वादळी वार्यासह जोरदार पावसाची शक्यता
मुंबई – अरबी समुद्र आणि तमिळनाडूची किनारपट्टी यांमध्ये हवेचा अल्प दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी ३० नोव्हेंबरपासून पुढील ३ दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने कोकणासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध जिल्हे यांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे.
मुंबईसह, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, संभाजीनगर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या १६ जिल्ह्यांना हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ (जोरदार पाऊस) घोषित केला आहे. या ठिकाणी वेगवान वार्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील शेतकर्यांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.