विनामास्क ग्राहकांमुळे होणार्या दंडाविषयी व्यापार्यांची आंदोलनाची चेतावणी !
कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीच्या पार्श्वभूमीवर ‘सर्वांनी मास्क घालणे’, हे सर्वांचे सामाजिक दायित्व आहे, असे व्यापार्यांना वाटत नाही का ? मास्क नसलेल्या ग्राहकांना व्यापारी मास्क घालण्याची विनंती करू शकत नाहीत का ? किंवा त्यांना एखादा मास्क विनामूल्य देऊ शकत नाहीत का ? सरकार जागृतीसाठी करत असलेल्या प्रयत्नांना यामुळे अडथळा येईल, हे लक्षात न येणारे व्यापारी स्वार्थीच होत ! – संपादक
नाशिक – कोरोनाच्या नवीन नियमावलीमुळे व्यापारीवर्गात अप्रसन्नता आहे. नवीन नियमानुसार दुकानात आलेले ग्राहक विनामास्क दिसल्यास दुकानदाराला १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. ‘हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा आम्ही आंदोलन करू’, अशी चेतावणी व्यापार्यांनी प्रशासनाला दिली आहे.