चांदीवाल आयोगापुढे चौकशीसाठी उपस्थित राहिले असतांना सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांची चर्चा !
मुंबई पोलीस करणार चौकशी
मुंबई – निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची २९ नोव्हेंबर या दिवशी १ घंटा चर्चा झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील खंडणीच्या आरोपाप्रकरणी चांदीवाल आयोगापुढे चौकशीसाठी उपस्थित राहिलेले ते एकमेकांना भेटले. याविषयी अनिल देशमुख यांच्या अधिवक्त्यांनी आक्षेप घेतला आहे. या भेटीविषयी अधिकृत अनुमती होती का ? याविषयीची माहिती मुंबई पोलीस घेत आहेत. ‘खंडणी वसुलीचे काम माझ्याकडून करवून घेण्यात आले; मात्र परमबीर सिंह यांनी अशा प्रकारे कोणते कृत्य न करण्याविषयी मला सांगितले होते’, असे सचिन वाझे यांनी चांदीवाल आयोगापुढे सांगितले आहे.