कर्नाटकातून महाराष्ट्रात येणार्यांची कर्नाटक सीमेवर पडताळणी होणार ! – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’च्या पार्श्वभूमीवर निर्णय !
कोल्हापूर – दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेल्या काही प्रवाशांमध्ये कोरोना संक्रमित आढळले असून त्यांच्यात ‘ओमिक्रॉन’ हा नवा ‘व्हेरियंट’ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी म्हणून कर्नाटकातून महाराष्ट्रात येणार्या नागरिकांची आता कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर आजपासून पडताळणी नाके चालू करण्यात येत आहेत. आता कर्नाटकातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करतांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस घेतलेले प्रमाणपत्र किंवा ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत दिली.