मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेपोटी भगवा सोडून हिरवा झेंडा हातात घेतला ! – किरीट सोमय्या
अमरावती – वर्ष १९९२-९३ मध्ये झालेल्या दंगलीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतः रस्त्यावर उतरले होते. ‘आता हिंदू मार खाणार नाहीत’, असे त्यांनी म्हटले होते. मुसलमानांचे ३ ठिकाणी मोर्चे निघाले. दुसर्या दिवशी अशा मोर्च्यांचे पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याला ‘हिंसाचार’ म्हणतात.
Kirit Somaiya | सत्तेपोटी उद्धव ठाकरेंनी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला; किरीट सोमय्यांचा घणाघात #kiritsomaiya #UddhavThackeray pic.twitter.com/h0Y2IRFacA
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 30, 2021
उद्धव ठाकरे यांच्या सरकारमुळेच हा मुसलमानांचा अत्याचार होत आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेपोटी भगवा सोडून हिरवा झेंडा हातात घेतला आहे, अशी टीका माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी २९ नोव्हेंबर येथे एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केली. किरीट सोमय्या हे अमरावती जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत.