संत ज्ञानेश्वर माऊलींचे विचार शाश्वत असून मानवकल्याणासाठी आवश्यक ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल
पुणे – संत ज्ञानेश्वर माऊलींचे विचार शाश्वत असून समाजाला या विचारांची आज आवश्यकता आहे. मानवकल्याणासाठी या विचारांचा प्रसार संपूर्ण विश्वात व्हावा, असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्या वेळी ते बोलत होते. तेव्हा त्यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. राज्यपालांनी मंदिर परिसराला भेट देऊन माहिती घेतली. pic.twitter.com/Cisv8RPvro
— Governor of Maharashtra (@maha_governor) November 29, 2021