बुद्धीप्रामाण्यवाद्यांमध्ये सत्य शोधण्याची क्षमता येण्यासाठी त्यांनी प्रथम स्वतःची आध्यात्मिक योग्यता वाढवणे आवश्यक आणि त्यासाठी त्यांनी केवळ बुद्धीने तर्क-वितर्क न करता प्रत्यक्ष साधना करणे हेही आवश्यक !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, सत्य शोधण्याची क्षमता यायला प्रथम स्वतःची आध्यात्मिक पात्रता वाढवा !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

कु. मधुरा भोसले

‘सत्य हे अत्यंत गूढ आणि सूक्ष्मतम असते. त्यामुळे ते शोधण्यासाठी बुद्धीही सूक्ष्मतम होणे आवश्यक आहे. बुद्धी सूक्ष्मतम होण्यासाठी योग्य प्रकारे व्यष्टी आणि समष्टी साधना करणे आवश्यक असते. साधना केल्यामुळे मनुष्यातील सत्त्वगुण वाढतो आणि त्याची बुद्धी सूक्ष्मतम होते. अशाप्रकारे साधना केल्यामुळे संत आणि ऋषिमुनी यांची बुद्धी सूक्ष्मतम झालेली असते. त्यामुळे संत आणि ऋषिमुनी सूक्ष्मतम असणार्‍या परमात्म्यापर्यंत पोचून त्याचे दर्शन घेऊ शकतात आणि त्याला अनुभवू शकतात. अध्यात्मातील गूढ सत्य जाणून घेण्यासाठी मनुष्यामध्ये संत आणि ऋषिमुनी यांच्यासारखी तीव्र तळमळ, चिकाटीने अनेक वर्षें साधना करण्याची सिद्धता अन् जिज्ञासूवृत्ती असणे आवश्यक आहे. या गुणांच्या आधारेच आपण अध्यात्मातील सत्य जाणू शकतो आणि अध्यात्मातील विविध सिद्धांत अनुभवू शकतो. त्यामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी सत्य शोधण्याची क्षमता यायला स्वतःचीच आध्यात्मिक पात्रता वाढवा, म्हणजे केवळ बुद्धीने तर्क-वितर्क न करता प्रत्यक्ष साधना करण्यास आरंभ करावा.’ – कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१२.२०१८, रात्री ११.२०)