आफ्रिकेतून ८७ जण मुंबईत; दोघे कोरोना ‘पॉझिटिव्ह’
मुंबई – आफ्रिकेमधून मुंबईमध्ये ८७ जण आले असून त्यांचा शोध घेण्याचे काम (ट्रेसिंग) चालू आहे. यातील दोन जणांची कोरोना विषाणूची चाचणी सकारात्मक (पॉझिटिव्ह) आली आहे. हे दोघेजण डोंबिवली येथे रहाणारे आहेत, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. या दोघांमध्ये ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ची लक्षणे आहेत कि नाहीत, याची तपासणी बाकी आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.