अमृतासमान असणार्या देशी गायीच्या तुपाचे औषधी उपयोग !
देशी गायीचे तूप अमृतासमान असणे
‘देशी गायीच्या तुपाला ‘अमृत’ म्हटले आहे; कारण ते तारुण्य कायम राखते आणि वार्धक्याला दूर ठेवते. काळ्या गायीचे तूप खाल्ल्यामुळे वृद्ध व्यक्तीही तरुणासारखा होऊन जातो. गायीच्या तुपासारखी उत्तम वस्तू दुसरी कोणतीही नाही.
देशी गायीच्या तुपाचे औषधी उपाय पुढीलप्रमाणे आहेत –
१. देशी गायीच्या तुपाचे दोन थेंब सकाळ-संध्याकाळ नाकात घातल्यामुळे अर्धशिशीच्या (‘मायग्रेन’च्या) वेदना थांबतात.
२. डोके दुखत असतांना अंगात उष्णता वाढते. त्या वेळी गायीच्या तुपाने पायाच्या तळव्यांना चोळल्यावर डोकेदुखी बरी होते.
३. नाकात तुपाचे थेंब घातल्यावर नाकाचा कोरडेपणा दूर होतो आणि बुद्धी तरतरीत होते.
४. गायीचे तूप नाकात घातल्यामुळे मानसिक शांती मिळते आणि स्मरणशक्ती चांगली होते.
५. हाता-पायांमध्ये जळजळ होत असल्यास गायीचे तूप तळव्यांना चोळावे. त्यामुळे जळजळ थांबते.
६. २० ते २५ ग्रॅम गायीचे तूप आणि साखर खाल्ल्यावर मद्य, भांग किंवा गांजा यांची नशा उतरते.
७. पायाच्या भेगांवर गायीचे देशी तूप लावल्यानंतर आराम मिळतो.
८. गायीचे तूप छातीवर चोळल्यावर लहान मुलांच्या छातीतील कफ बाहेर निघण्यास साहाय्य होते.
९. सर्पदंश झाल्यानंतर १०० ते १५० ग्रॅम तूप पाजावे आणि त्यावर जेवढे जाईल तेवढे कोमट पाणी पाजावे. त्यामुळे उलट्या आणि जुलाब होऊ लागतात अन् सापाचे विष उतरण्यास साहाय्य होते.
१०. जर अशक्तपणा अधिक वाटत असेल, तर एक पेलाभर दुधात एक चमचा गायीचे तूप आणि थोडीशी साखर घालून नियमितपणे प्यावे.
११. गायीच्या तुपाचे नियमित सेवन केल्यामुळे पित्त (ॲसिडीटी) आणि बद्धकोष्ठता यांच्या व्याधी उणावतात.
१२. ज्याला हृदयविकाराचा त्रास आणि स्निग्ध पदार्थ न खाण्याचे पथ्य असेल, त्याने गायीचे तूप खावे. त्यामुळे हृदय बळकट होते.
१३. गायीच्या तुपाने वजन संतुलित होते, म्हणजे बारीक व्यक्तीचे वजन वाढते आणि लठ्ठ व्यक्तीचा लठ्ठपणा न्यून होऊन वजन घटते.
१४. गायीच्या तुपाने बळ आणि वीर्य वाढते. शारीरिक आणि मानसिक शक्तीमध्येही वाढ होते.
१५. देशी गायीच्या तुपामध्ये कर्करोगाशी लढण्याची क्षमता असते. तुपाच्या सेवनाने स्तन आणि आतड्यांच्या गंभीर अशा कर्करोगापासून रक्षण होते.
१६. गायीचे तूप ना केवळ कर्करोग निर्माण होण्यापासून रोखते (प्रतिबंध करते), तर कर्करोग शरिरात पसरण्यालाही आश्चर्यकारकपणे प्रतिबंध करते.
१७. गायीचे तूप नाकात घातल्यामुळे वेडसरपणा दूर होतो.
१८. गायीचे तूप नाकात घातल्यामुळे व्यक्तीला बेशुद्धावस्थेतून (कोमातून) शुद्धीवर येण्यास साहाय्य होते.
१९. गायीचे तूप नाकात घातल्यावर अर्धांगवायूच्या (लकव्याच्या) रोगावरही उपचार होतात.
२०. गायीचे तूप नाकात घातल्यामुळे केस गळणे थांबून नवीन केस येऊ लागतात, तसेच कानाचा पडदा शस्त्रकर्माविना बरा होतो.
२१. गायीचे तूप नाकात घातल्यामुळे ‘ॲलर्जी’ (काही विशिष्ट प्रकारच्या अन्नाविषयी अहितकारक प्रतिक्रिया निर्माण करणारी शरिराची आरोग्यविषयक स्थिती) नष्ट होते.
२२. विशेषतः चांगली प्रकृती असणार्या व्यक्तींनीही प्रतिदिन नियमितपणे झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यांमध्ये देशी गायीचे कोमट तूप घालावे. त्यामुळे शांत झोप लागते, घोरणे बंद होते आणि अनेक व्याधींपासून (आजारांपासून) सुटकाही होते.
‘गाईच्या तुपाने रक्तातील कोलेस्टेरॉल वाढत नाही’ हे लक्षात ठेवावे.
लेखक : श्री. उकेशसिंह चौहान (साभार : ‘क्षात्रधर्म विचार मंथन’)