ब्रिटीश नागरिकत्व स्वीकारलेल्या सरकारी मदरशाच्या मौलानाकडून अवैधरित्या वेतन आणि नंतर निवृत्तीवेतन घेऊन सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !
|
संत कबीरनगर (उत्तरप्रदेश) – आझमगडच्या एका मदरशामध्ये ब्रिटनचे नागरिकत्व घेतल्यानंतरही एका मौलानाने नोकरीवर कायम राहून वेतन घेतले. एवढेच नाही, तर सेवानिवृत्तीनंतर ब्रिटनला स्थायिक झाल्यानंतरही त्याने प्रतिमास ४० सहस्र रुपये निवृत्ती वेतन घेतले. ही घटना समोर आल्यावर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने उत्तरप्रदेशच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून आरोपीच्या विरोधात कारवाई करण्यास सांगितले आहे.
मौलाना ब्रिटिश नागरिकता के बाद भी मदरसे से लेता रहा सैलरी और बाद में ₹40,000 पेंशन: मनी लॉन्ड्रिंग सहित अवैध विदेशी फंडिंग का मामला#UttarPradeshhttps://t.co/WMdnZGXvgm
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 24, 2021
संत कबीरनगर जिल्ह्यातील खलीलाबाद क्षेत्रातील सहसरॉव माफी या गावात ही घटना घडली आहे. येथीलच अब्दुल करीम नावाच्या व्यक्तीने तक्रार केली होती की, मौलाना शमशुल होदा यांनी ब्रिटीश नागरिकत्व घेतल्यानंतरही ते सरकारी मदरशाचे मौलाना म्हणून वेतन घेत होते आणि आता सेवानिवृत्ती घेतल्यानंतर निवृत्ती वेतन घेत आहेत. (तक्रार केली नसती, तर ही फसवणूक उघड झाली नसती. हे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक) करीम यांना शमशुल होदा यांच्यावर संशय होता. त्यामुळे त्यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती मिळवली. शमशुल यांनी वर्ष २०१३ मध्येच ब्रिटीश नागरिकत्व स्वीकारले होते. त्यानंतर ४ वर्षे ते मदरशामध्ये शिकवत होते. वर्ष २०१७ मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतरही ते निवृत्ती वेतन घेत होते. घटनेच्या अनुच्छेद ६६ प्रमाणे असे करणे अवैध आहे. मिळालेल्या माहितीनुसार ब्रिटनचे नागरिकत्व घेतलेल्या शमशुल होदा यांनी सरकारी नोकरी आणि निवृत्ती वेतन यांच्या रूपात आतापर्यंत १ कोटी रुपयांहून अधिक रक्कम हडपली आहे. निवृत्ती वेतन म्हणून त्यांना प्रति मास ४० सहस्र रुपये मिळत होते.