काशी विश्वनाथ मार्गाच्या उद्घाटनाला २५ सहस्र साधू, संत, महंत आणि धर्माचार्य यांना आमंत्रित करणार !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – काशी येथील काशी विश्वनाथ मंदिर मार्गाच्या उद्घाटनाला देशभरातील २५ सहस्र साधू, संत, महंत आणि धर्माचार्य आदींना आमंत्रित करण्यात येणार आहे. या सर्वांना या प्रकल्पाच्या अंतर्गत काशीमध्ये झालेल्या परिवर्तनाची विस्तृत माहितीही दिली जाणार आहे. संतांसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, २०० शहरांचे महापौर आदीही या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन केले जाणार आहे.
काशी विश्वनाथ धाम कॉरिडोर का उद्घाटन जल्द#CMYogi #PMModi pic.twitter.com/cZywXhth4r
— India TV (@indiatvnews) November 28, 2021