पुढील पावसाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्याची मागणी !
नागपूर – नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे होणे अपेक्षित आहे. यासाठी काँग्रेसचे नेते आग्रही आहेत, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आहे; तथापि ‘पुढील पावसाळी अधिवेशन नागपूर येथे व्हावे’, अशी प्रतिक्रिया नाना पटोले, पालकमंत्री नितीन राऊत आणि पशूसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी २८ नोव्हेंबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना दिली.