श्री विठ्ठल पालखी सोहळ्याचे हडपसर (पुणे) येथे उत्साहात स्वागत !
पुणे – श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूर येथून निघालेल्या श्री विठ्ठल पालखीचे हडपसर परिसरातील बंटर शाळेच्या आवारामध्ये भाविकांनी उत्साहात स्वागत केले. ‘श्री हरि विठ्ठल’ नामघोषात पालखीचे भाविकांनी दर्शन घेतले. या पालखीसमवेत महाराष्ट्राच्या विविध भागांतून अनेक दिंड्या सहभागी झाल्या आहेत. या वेळी पादुकांना अभिषेक घालून त्यांची पूजा करण्यात आली. कीर्तन, भजन यांनी परिसर भक्तीमय झाला होता. काही काळ विश्रांती घेऊन हा पालखी सोहळा आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाला.