वीजदेयकावरून भाजपच्या माजी आमदारांचा महावितरण कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न !
नेवासा (जिल्हा नगर) – महाराष्ट्रात सर्वत्र महावितरणने सक्तीची थकीत वीजदेयक वसुली मोहिम राबवली आहे. नेवासे तालुक्यातील शेतकर्यांची शेतीपंपाची वीजजोडणी महावितरण खंडित करत आहे. या विरोधात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी वेळोवेळी निवेदने दिली होती. त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने मुरकुटे यांनी नेवासे महावितरण कार्यालयामध्ये जाऊन आंदोलन चालू असतांना दोरी लावून गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
भाजपच्या माजी आमदाराचा MSEB कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न, थरारक VIDEO समोर #BJP #BalasahebMurkute #MSEBhttps://t.co/9Mr2QtAPit
— News18Lokmat (@News18lokmat) November 23, 2021
त्या वेळी त्यांच्या समवेत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवले. तेव्हा त्यांचा श्वास रोखला गेल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असून आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे.