हिंदूंना ‘हिंदू’ रहायचे असेल, तर भारताला अखंड बनवावेच लागेल ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – भारताला ‘भारत’ म्हणून रहायचे असेल, तर भारत ‘हिंदू’ म्हणूनच रहायला हवा. त्याचप्रमाणे हिंदूंना ‘हिंदू’ म्हणून रहायचे असेल, तर भारताला अखंड बनवावेच लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे एका कार्यक्रमात केले.

सरसंघचालक पुढे म्हणाले की,

१. हिंदूंविना भारत नाही आणि भारताविना हिंदू नाही. भारत तुटला, पाकिस्तान उदयाला आला; कारण ‘आपण हिंदू आहोत’ हेच विसरून गेलो. प्रथम स्वतःला हिंदू समजणार्‍यांची शक्ती न्यून झाली आणि नंतर संख्या. त्यामुळे पाकिस्तान ‘भारत’ म्हणून राहिला नाही.

२. हा हिंदुस्तान आहे आणि येथे परंपरेने हिंदूच रहात आले आहेत. ज्या ज्या गोष्टीला ‘हिंदू’ म्हणून संबोधले जाते, त्या सगळ्यांचा विकास या भूमीत झाला आहे. भारताच्या सर्व गोष्टी भारताच्या भूमीशी जोडलेल्या आहेत. हा योगायोग नाही.