उत्तरप्रदेशात प्रतिदिन गायब होतात ३ मुली !
१२ ते १८ वयोगटांतील मुलींची संख्या सर्वाधिक
|
आगरा (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश राज्यात वर्ष २०२० मध्ये १ सहस्र ७६३ मुले बेपत्ता झाली आहेत. विशेष म्हणजे यांमध्ये १ सहस्र १६६ मुली आहेत, म्हणजे उत्तरप्रदेश राज्यात प्रतिदिन ३ मुली बेपत्ता होतात. ही आकडेवारी माहिती अधिकारातून उघड झाली आहे. ५० जिल्ह्यांतील माहिती अधिकारांतून ही माहिती मिळाली आहे.
Five children, including 3 girls, go missing every 24 hours in Uttar Pradesh: RTI https://t.co/vZVMLU7jhp
— The Times Of India (@timesofindia) November 27, 2021
१. उत्तरप्रदेश पोलिसांनी सांगितले की, बेपत्ता झालेल्या मुलींपैकी १ सहस्र ८० मुलींचे वय १२ ते १८ वर्षे आहे. यांपैकी ९६६ मुलींचा शोध घेण्यात आला; मात्र अद्याप २०० मुलींविषयी कुठलीही माहिती मिळालेली नाही.
२. आगरा येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि बाल अधिकार कार्यकर्ते नरेश पारस यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळावली आहे. ते म्हणाले की, काही जिल्ह्यांतील पोलिसांनी माहिती अधिकाराद्वारे माहिती देण्यास थेट नकार दिला. मुलांचे अशा प्रकारे बेपत्ता होणे, ही चिंतेची गोष्ट आहे. मुले बेपत्ता होऊन ४ मास झाले आणि त्यांच्याविषयी कोणत्याही प्रकारची माहिती मिळू शकली नाही, तर ती प्रकरणे मानवी तस्करीविरोधी विभागाकडे सोपवण्याची तरतूद आहे. असे असूनही बेपत्ता मुलांची संख्या वाढत आहे.