मी आजही सत्तेत नाही अन् भविष्यातही नसेन, मला केवळ सेवा करायची आहे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधानांचे ‘मन की बात’मध्ये प्रतिपादन
नवी देहली – मला सत्तेत जाण्याचा आशीर्वाद देऊ नका. मी गरिबांच्या सेवेसाठी आहे. मी आजही सत्तेत नाही आणि भविष्यातही मला सत्तेत जायचे नाही. मला केवळ सेवेत रहायचे आहे. माझ्यासाठी हे पद केवळ सत्तेसाठी नाही, तर सेवेसाठी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमात एका नागरिकाच्या विधानावर केले. या वेळी ‘आयुष्मान भारत योजने’चे लाभार्थी राजेश कुमार प्रजापती यांच्याशी चर्चा करतांना पंतप्रधान मोदी यांनी प्रजापती यांना होणार्या लाभाविषयी विचाल्यावर ते म्हणाले, ‘या योजनेचा मला फार लाभ झाला आहे. मला नेहमी तुम्हाला सत्तेत पहायचे आहे.’ यावर पंतप्रधान मोदी यांनी वरील प्रतिपादन केले.
PM Modi said, “It is true that this is the era of start-ups and it is also true that in the field of start-ups, in a way, India is leading the world.”#MannKiBaathttps://t.co/HKguwFHRrk
— Zee News English (@ZeeNewsEnglish) November 28, 2021