भारतीय अर्थव्यवस्थेला धोका ठरणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !
देवगड येथील व्यापारी, विविध संघटना यांची केंद्रशासनाकडे मागणी
देवगड – सध्या भारतात धर्मांधांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात ‘हलाल’ प्रमाणित (सर्टिफाईड) असण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नसून धर्मांधांकडून आता धान्य, फळे, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी उत्पादनांसाठीही केली जात आहे. या ‘हलाल’ अर्थव्यवस्थेमुळे अल्पसंख्य धर्मांधांची बहुसंख्यांकांवर एक प्रकारची हुकूमशाहीच चालू आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी येथील विविध संघटनांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे. याविषयी मा. गृहमंत्री, भारत सरकार; सचिव, गृहमंत्रालय, भारत सरकार; व्यापार आणि व्यवसायमंत्री अन् सचिव, व्यापार आणि व्यवसायमंत्री, भारत सरकार यांना द्यायचे निवेदन या संघटनांच्या पदाधिकार्यांनी देवगडचे तहसीलदार मारुती नाना कांबळे यांना दिले.
हिंदूंचा व्यापार आणि अर्थव्यवस्था यांत हस्तक्षेप करून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ‘हलाल प्रमाणपत्र’ हे जागतिक षड्यंत्र आहे. या ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी देवगड येथे उद्योजक, व्यापारी, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, हितचिंतक, पत्रकार आदींना मार्गदर्शन केले होते. त्यानंतर देवगड तालुका मोटार चालक-मालक संघटनेचे खजिनदार श्री. सुधीर मांजरेकर, देवगड तालुका भंडारी समाज मंडळाचे सचिव श्री. सुनील रघुनाथ बिर्जे, जामसंडे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष श्री. संतोष किंजवडेकर, जामसंडेचे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. माधव कुलकर्णी, तळेबाजार येथील धर्माभिमानी श्री. सत्यवान परब, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद मोंडकर, श्री. अशोक करंगुटकर आणि श्री. भास्कर खाडिलकर यांनी एकत्र येत २६ नोव्हेंबर या दिवशी देवगडचे तहसीलदार मारुती नाना कांबळे यांना ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद करण्याविषयीचे निवेदन दिले. (‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्थेचा धोका ओळखून त्वरित कृतीशील झालेल्या देवगड येथील विविध संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांचे अभिनंदन ! इतरांनीही यातून बोध घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद करण्यासाठी आपापल्या स्तरावर कृती करावी ! – संपादक)
‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी माहिती मिळाल्यानंतर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया
१. श्री. सुधीर मांजरेकर, खजिनदार, देवगड तालुका मोटर चालक-मालक संघटना – हे षड्यंत्र लवकरात लवकर थांबायला हवे, अशी आंतरिक तळमळ आहे. यासाठी मी सदैव सिद्ध आहे.
२. श्री. सत्यवान परब, धर्माभिमानी, तळेबाजार – हिंदूंनी आता जागृत रहाणे अत्यंत आवश्यक आहे. ‘हलाल’ची अर्थव्यवस्था भविष्यात आपल्या नाशाला कारणीभूत ठरणार आहे. पैशांना दुय्यम, तर धर्माला अग्रस्थानी ठेवून अशा संकटांच्या वेळी एकत्र येणे ही काळाची आवश्यकता आहे. अशा धर्मकार्यामध्ये मला सहभागी होता आल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.