हिंगोली येथे नक्षलवादी होण्याची मागणी करणार्या शेतकर्यांनी वीजजोडणीसाठी विहिरीत उड्या मारल्या !
हिंगोली – सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे कृषीपंपाची वीजजोडणी देण्यात यावी, या मागणीसाठी विठ्ठल सावके, राहुल सावके, शिवाजी कवर, महेश पाटील आणि मानव खोंडकर या शेतकर्यांनी २६ नोव्हेंबर या दिवशी गावातील विहिरीत उड्या मारल्या. त्यानंतर गावकर्यांनी काही जणांना बाहेर काढले. प्रशासकीय अधिकार्यांनी केलेल्या २ घंट्यांच्या प्रदीर्घ चर्चेनंतरही तोडगा न निघाल्याने शेतकर्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे अधिकारी हिंगोली येथे परतले. हा प्रश्न सुटत नसल्याने शेतकर्यांनी ४ दिवसांपूर्वी सरकारकडे निवेदन पाठवून नक्षलवादी होण्याची अनुमती मागितली होती. २५ नोव्हेंबर या दिवशी कनेरगावनाका येथे शेतकर्यांनी ‘रस्ता बंद’ आंदोलनही केले.