जून २०२१ मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्. ट्विटर’, ‘एस्.एस्.आर्.एफ्. इन्स्टाग्राम’ आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्. लाईव्ह चॅट’ या माध्यमांतून जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय
१. ‘एस्.एस्.आर्.एफ्. ट्विटर’
‘ज्यांच्याकडे आपण आपल्या शंकांचे निरसन करून घेऊ शकतो आणि ज्यांच्या साहाय्याने आपण एक सुंदर आध्यात्मिक जीवन जगू शकतो, असे कुणीतरी आहे, यासाठी पुष्कळ धन्यता वाटते. तुम्ही देत असलेल्या उत्तरांसाठी आभारी आहे.’
– श्री. नवीन
२. ‘एस्.एस्.आर्.एफ्. इन्स्टाग्राम’
‘मी अनेक वर्षे ‘एस्.एस्.आर्.एफ्.’निर्मित उदबत्ती वापरत आहे. तुमच्या उदबत्तीसारखी उदबत्ती मी कुठेच पाहिली नाही. उदबत्ती लावल्यानंतर अनिष्ट शक्ती खरंच दूर जातात.’
– श्री. निक रॉबर्टस्
३. ‘एस्.एस्.आर्.एफ्. लाईव्ह चॅट’
३ अ. साधनेमुळे मला आणि माझ्या आई वडिलांना पुष्कळ साहाय्य झाले आहे ! : ‘मी साधना करण्यास आरंभ केला आहे. साधनेमुळे मला आणि माझ्या आई-वडिलांना पुष्कळ साहाय्य झाले आहे. तुम्ही करत असलेले कार्य पुष्कळ चांगले आहे. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने घेण्यात येणार्या ‘लाईव्ह स्ट्रीम (थेट प्रक्षेपण)’ कार्यक्रमांना उपस्थित रहाण्यास आणि अध्यात्माविषयी अधिक माहिती जाणून घेण्याविषयी तुम्ही सांगत असता. हे सांगण्यामागे ‘आमची अध्यात्मात प्रगती व्हावी, आमचे रक्षण व्हावे किंवा आमच्या मृत्यूनंतरही आम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या साहाय्य व्हावे’, असाच तुमचा उद्देश असतो. आज प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक नातेसंबंध व्यावहारिक स्तरावर होत असतांना तुम्ही परतफेड म्हणून आमच्याकडून काहीही मागत नाही. तुम्ही मानवतेची खरी निरपेक्ष सेवा करत आहात. आम्हाला नवनवीन माहिती पाठवत असल्याबद्दल धन्यवाद !’
– सौ. पौषाली बंड्योपाध्याय, भारत
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |