महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढणार्‍या रुग्ण संख्येमुळे पुन्हा निर्बंध लागू !

राज्य सरकारची नवी नियमावली

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून वाढणार्‍या कोरोनाच्या रुग्ण संख्येमुळे राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी नियमावली शासनाकडून घोषित करण्यात आली आहे.

यामध्ये सार्वजनिक वाहतुकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्यास अनुमती देण्यात आली आहे. तसेच मॉल, सभागृह, कार्यक्रम येथे लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यशासनाकडून ‘युनिव्हर्सल पास’ देण्यात आले आहेत. प्रवास करतांना लसीकरण प्रमाणपत्र आणि छायाचित्र ओळखपत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ‘व्हेरिएंट’मुळे चिंता वाढली आहे. केंद्र सरकारने याविषयी देशातील सर्व राज्य सरकारांना पत्र लिहून सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. परदेशातून येणार्‍या प्रवाशांविषयी विशेष दक्षता घ्यावी, असे केंद्राने कळवले आहे.