पंजाब येथे हिंदू आणि शीख यांच्या विरोधामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ख्रिस्ती मिशनर्यांच्या ‘चंगाई सभे’त जाण्याचे टाळले !
चंगाई सभेच्या मुख्य आयोजक असणार्या पाद्य्रावर हत्या आणि बलात्कार केल्याचे आरोप
टीप : ‘चंगाई सभा’ म्हणजे पाद्य्रांकडून आजारी असणार्यांवर प्रार्थनेद्वारे उपचार करून त्यांना कथितरित्या बरे करणे
चंडीगड – पंजाब येथे हिंदू आणि शीख यांनी केलेल्या विरोधामुळे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी ख्रिस्ती मिशनर्यांनी आयोजित केलेल्या मोगा येथील ‘चंगाई सभे’त जाण्याचे टाळले. यासाठी विश्व हिंदु परिषदेने हिंदू आणि शीख यांचे अभिनंदन केले आहे. विहिंपने मुख्यमंत्री चन्नी यांना राज्यात ख्रिस्ती मिशनर्यांना धर्मांतरासाठी प्रोत्साहन देऊ नये, असे म्हटले आहे. यासह ख्रिस्ती मिशनर्यांनाही चेतावणी दिली आहे.
पंजाब: हिंदू-सिखों के विरोध के चलते प्रोफेट बजिंदर के ‘चंगाई सभा’ में नहीं पहुँच सके CM चन्नी, धर्मांतरण कराने के लग चुके हैं आरोप https://t.co/HAwZNBHkao
— Falana Dikhana (@FDikhana) November 26, 2021
१. विहिंपचे केंद्रीय संयुक्त सचिव डॉ. सुरेंद्र जैन म्हणाले की, अशा सभांमध्ये ख्रिस्ती मिशनर्यांकडून लोकांना बरे करण्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात कोरोनाच्या काळात पाद्य्रांचाही मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांना खिस्ती मिशनरी का बरे करू शकत नाहीत ? अशा ‘चंगाई सभां’वर संपूर्ण देशात बहिष्कार घातला गेला पाहिजे.
२. विहिंपचे मोगा येथील जिल्हाध्यक्ष शर्मा म्हणाले की, जिल्ह्यातील धर्मांतराचा मुख्य सूत्रधार पास्टर बजिंदर सिंह हा आहे. त्याच्यावर हत्या, बलात्कार आणि धर्मांतर करण्याचे आरोप आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी हे ‘क्रिप्टो ख्रिस्ती’ ! – विहिंप
विहिंपचे मोगा जिल्हाध्यक्ष शर्मा यांनी ‘राज्याचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी हे ‘क्रिप्टो ख्रिस्ती’ आहेत’, असा आरोपही केला. ‘क्रिप्टो ख्रिस्ती’ म्हणजे गुप्त रूपाने ख्रिस्ती असणारे; मात्र सार्वजनिक स्तरावर मूळ धर्मानुसार वागणारे.
पंजाब में धर्मान्तरण को बढ़ावा न दें मुख्यमंत्री, फूँक से कोई ठीक होता तो कोरोना में कई पादरी क्यों मरे? – VHP जिलाध्यक्ष ने चन्नी को बताया ‘क्रिप्टो क्रिश्चियन’#Punjab #VHP #Channihttps://t.co/tUHOpvz6MU
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 26, 2021