हत्या करणार्‍या मारेकर्‍यांना अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त नाशिककर रस्त्यावर उतरले !

नाशिककरांच्या सहनशीलतेचा अंत !

  • गुन्हेगारांना अटक न करणारे हतबल पोलीस काय कामाचे ? – संपादक
  • शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागणे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक
प्रातिनिधिक छायाचित्र

नाशिक – भाजीपाला विक्रेता राजू शिंदे यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर शहरातील वातावरण तणावाचे होऊन संतप्त नाशिककर रस्त्यावर उतरले होते. ‘शहरात हत्या आणि आक्रमण यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने या घटनांतील मारेकर्‍यांना तात्काळ अटक करा’, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे. शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने जमाव पांगला; मात्र लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे.

२३ नोव्हेंबर या दिवशी एका ४ वर्षांच्या मुलीचे लॉकेट हिसकावण्याच्या प्रयत्नात चोराने तिच्यावर कट्यारीने आक्रमण केले. या मुलीवर अजूनही उपचार चालू आहेत. त्यापूर्वी पोलीसांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती.