मरळगोई खुर्द (नाशिक) येथे सासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या !
पतीसह तिघांना अटक !
नाशिक – जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द येथील महिला सरपंच सौ. योगिता फापाळे यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचे भाऊ संतोष गवळी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बहीण योगिता या सरपंच झाल्यापासून सासरचे लोक त्यांचा छळ करत होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी रहात्या घरी विषारी औषध सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना २३ नोव्हेंबरच्या रात्री घडली. या प्रकरणी लासलगाव पोलिसांनी सासरे बाबासाहेब फापाळे, पती अनिल फापाळे, सासू सरला फापाळे आणि दीर प्रदीप फापाळे यांच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करून या सर्वांना अटक केली आहे.