पृथ्वीवरील समुद्रात विशालकाय उल्कापिंड कोसळणार !

भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमसने केलेली वर्ष २०२२ ची भविष्यवाणी

  • समुद्रकिनारी असणार्‍या शहरांची मोठी हानी होणार !

  • वर्ष २०२२ मधील विनाशानंतर जगात शांतता नांदणार !

नवी देहली – फ्रान्समधील जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस याने ५ शतकांपूर्वी सहस्रो भविष्ये लिहून ठेवली असून त्यांतील अनेक भविष्ये खरी ठरली आहेत. त्याच्या पुस्तकात एकूण ६ सहस्र ३३८ भविष्ये वर्तवलेली आहेत. त्याने २०२२ या वर्षाचेही भविष्ये वर्तवले आहे. यात म्हटले आहे की, पृथ्वीवरील समुद्रात उल्कापिंड (विशालकाय दगड) कोसळणार असून त्यामुळे समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळणार आहेत. यामुळे समुद्राच्या पाण्याचा स्तर वाढल्याने समुद्रकिनारी असणार्‍या शहरांची मोठी हानी होणार आहे. विशेष म्हणजे वर्ष २०२२ मधील विनाशानंतर जगात शांतता नांदणार आहे, असे त्याने नमूद केले आहे.

नॉस्ट्रॅडॅमसने पुढे म्हटले आहे की,

१. वर्ष २०२२ मध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढेल. अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य कोसळेल. लोक सोने, चांदी आणि आभासी चलन (बिटकॉईन इत्यादी) यांनाच संपत्ती समजू लागतील. यामध्येच लोक अधिक पैसा गुंतवू लागतील आणि हेच कारण पृथ्वीला उद्ध्वस्त करणार आहे.

२. वर्ष २०२२ मध्ये अणुबाँबच्या स्फोटामुळे हवामानात पालट होईल. यासमवेत पृथ्वीच्या स्थितीतही पालट होऊ शकतो.

३. हवामान पालटाच्या आधी ७२ घंटे जग अंधारात लोटले जाईल. शरद ऋतूत पर्वतांवर बर्फवृष्टी होऊ शकते. एका नैसर्गिक घटनेमुळे अनेक देशांतील युद्ध संपुष्टात येईल. ३ दिवस जग अंधारात असेल आणि त्यानंतर आधुनिक जीवन संपेल.

४. वर्ष २०२२ मध्ये फ्रान्सवर मोठे संकट येईल. देशात मोठे वादळ येईल, जे विनाश घडवील. त्यामुळे जगातील अनेक भागांत भीषण आग, दुष्काळ आणि पूर अशी परिस्थिती निर्माण होईल. मोठ्या प्रमाणावर भूकबळीची समस्या जाणवेल.

५. वर्ष २०२२ मध्ये संगणकाचा मेंदू मानवांवर नियंत्रण ठेवू शकतो. ‘रोबोट्स’मुळे मानवजातीचा अंत होईल.

६. मेनोर्का बेटाजवळील भूमध्य समुद्रात क्षेपणास्त्र चाचणीच्या वेळी मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे.