सूर्य काळ्या ढगांच्या पाठी आणि पांढर्या ढगांच्या पुढे दिसण्याचे शास्त्र !
‘जेव्हा सूर्य काळ्या रंगाच्या ढगांच्या पाठी असतो, तेव्हा त्याचे रूप काळ्या ढगांनी झाकल्यामुळे तो करड्या रंगाचा तेजस्वी गोळा दिसतो; परंतु त्याची कड मात्र चमकत असते. तेव्हा सूर्याकडून येणारा प्रकाश पुष्कळ प्रमाणात रोखला गेल्यामुळे सर्वत्रचा प्रकाश न्यून होतो. जेव्हा तो काळ्या रंगाच्या ढगांच्या पुढे असतो, तेव्हा तो पुष्कळ तेजस्वी दिसतो आणि त्याचे किरण काळ्या ढगांतून जातांना सोनेरी रंगाचे दिसतात.
जेव्हा सूर्य पांढर्या रंगाच्या ढगांच्या पाठी असतो, तेव्हा त्याचे रूप पांढर्या ढगांनी झाकल्यामुळे तो पांढर्या रंगाचा तेजस्वी गोळा दिसतो; परंतु त्याची कड मात्र चमकत असते. तेव्हा सूर्याकडून येणारा प्रकाश अल्प प्रमाणात रोखला गेल्यामुळे सर्वत्रचा प्रकाश अल्प प्रमाणात न्यून होतो. जेव्हा तो पांढर्या रंगाच्या ढगांच्या पुढे असतो, तेव्हा तो नेहमीप्रमाणे पिवळसर पांढर्या रंगाच्या तेजस्वी गोळ्याच्या रूपात दिसतो.
१. काळे ढग आणि पांढरे ढग
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.७.२०१९, रात्री ११.२५)
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. |