साधिकेच्या मुलाने नर्मदेतून आणलेल्या शाळीग्रामवर ‘ॐ’ उमटणे

श्रीमती शर्मिला पळणीटकर

‘मार्च २०२० मध्ये माझा मुलगा (श्री. महेश पळणीटकर) नर्मदा परिक्रमा करून आला. त्याने येतांना नर्मदेतील गोटे, म्हणजे शाळीग्राम आणले होते. ‘‘नर्मदेच्या पात्रातील गोट्यांची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही; कारण ‘त्यांत ‘शिव’ विद्यमान असतो’, असे पुराणांत सांगितले आहे. त्यामुळे आपण एक शाळीग्राम देवघरात ठेवू’’, असे मुलगा म्हणाला आणि नंतर त्याने देवघरात एक शाळीग्राम ठेवला. त्या शाळीग्रामाची तो प्रतिदिन पूजा करतो, तसेच प्रतिदिन सकाळ-संध्याकाळ नर्मदेची आरती करून शाळीग्रामाला नैवेद्यही दाखवतो. हे सर्व तो भावपूर्ण करतो. आता त्या गोट्यावर ‘ॐ’ उमटलेला दिसत आहे. त्यामुळे ‘देव आपल्या समवेत आहे’, हे अनुभवण्यास मिळाले.’

– श्रीमती शर्मिला पळणीटकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.६.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक