स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या धर्मांधाला फाशीची शिक्षा
अशा वासनांध धर्मांधांना हीच शिक्षा योग्य ! – संपादक
बहराईच (उत्तरप्रदेश) – येथे स्वतःच्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्या ४० वर्षीय नान्हू खान याला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. तसेच त्याला ५१ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मुलीच्या आईने म्हणजे नान्हू याच्या पत्नीने याविषयी पोलिसांत तक्रार केली होती. या मुलीचा विवाह करण्यात आला होता; मात्र काही दिवसांनी नान्हू तिला परत घरी घेऊन आला. नंतर तो सतत २ वर्षे तिच्यावर बलात्कार करत होता, असे त्याच्या पत्नीने तक्रारीत म्हटले होते.