‘सूर्यवंशी’च्या निमित्ताने !
संपादकीय
‘जिहादी आतंकवाद’ पोसणारा कोण ? हे सत्य समाजासमोर धडाडीने मांडले जावे !
चित्रपट हे समाजमनावर खोल आणि तात्काळ परिणाम करणारे माध्यम आहे. लोक चित्रपटांत दाखवल्या जाणार्या जीवनालाच वास्तविकता समजून जगतात. त्यामुळे चित्रपटांतून काय मांडावे ? हे चित्रपट दिग्दर्शकांचे मोठे दायित्व ठरते. गेल्या काही दशकांत अनेक दिग्दर्शकांनी मात्र हे सामाजिक भान जपले नाही, विशेषत: हिंदूंचे नकारात्मक चित्रण केले, असाच अनुभव आहे. काही चित्रपट वगळता बहुतांश चित्रपटांतून हिंदु पंडितांची जाणीवपूर्वक टिंगलटवाळी केली जाते. या समाजप्रवाहाच्या विरोधात जाऊन एखाद्या चित्रपट दिग्दर्शकाने त्याच्या चित्रपटात खलनायकाला मुसलमान दाखवले, तर त्यावर जिहादीप्रेमी थयथयाट चालू करतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचे उदाहरण याच वर्गातील आहे. या चित्रपटात पाकिस्तानातून येणार्या आतंकवाद्याचे नाव मुसलमान असल्याविषयी पाकचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी आक्षेप घेत थयथयाट केला आहे. यावर ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी ‘हिंदु खलनायक दाखवल्यावर प्रश्न का उपस्थित होत नाहीत ?’, असे सडेतोड उत्तर दिले आहे. मुळात वस्तूस्थिती दाखवण्यावर आक्षेप का ? हे येथे कळीचे सूत्रे आहे.
चित्रपटांद्वारे फोफावणारा ‘जिहाद’ !
देशात आतंकवादाच्या विरोधात जनमत प्रक्षुब्ध आहे. तरीही भारतातून आतंकवाद समूळ नष्ट झालेला नाही. काही दिवसांपूर्वी पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘भारतात अल्पसंख्यांक, विशेषतः मुसलमानांच्या विरोधातील हिंसा रोखली गेली पाहिजे. मुसलमानांचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण केले पाहिजे’, असा फुकाचा सल्ला दिला. स्वत:च्या देशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत असतांना आणि पाकिस्तान जाणीवपूर्वक भारतात आतंकवाद्यांना पाठवत असतांना अशी विधाने करण्याचा अधिकार पाकड्यांना कुणी दिला ? जिहादी आतंकवादाच्या संदर्भात असलेली वस्तूस्थिती नाकारणे, हाही एक प्रकारे वैचारिक आतंकवादच आहे. याला खतपाणी घालणार्यांचा दुर्दैवाने भारतातही भरणा आहे. हेच कारण आहे, गेली अनेक दशके नागरिकांच्या मनात आतंकवादाविषयी चीड असूनही तो समूळ नष्ट होत नाही, याचे ! दृश्य स्वरूपातील आतंकवादी आक्रमणांसमवेत जिहादी धर्मांधांनी त्यांचे हस्तक ठिकठिकाणी पेरले आहेत आणि ते पद्धतशीरपणे समाजाचा बुद्धीभेद करण्यासाठी कार्यरत आहेत. भारतात निघणार्या चित्रपटांमधून नेमके हेच केले जात आहे. जिहादी आतंकवादाचा पुरस्कार करणारा धर्म संपूर्ण मानवजातीसाठी धोकादायक आहे. चित्रपटांतून मात्र त्या धर्माविषयी आभासी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न दशकानुदशके चालू आहे. निष्पाप नागरिकांना क्रूरतेने मारणार्यांना ‘निष्पाप’ दर्शवण्याचा घृणास्पद प्रकार चित्रपटांच्या माध्यमातून चालू दिला जातो. अशा चित्रपटांमुळे ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन मिळून कित्येक हिंदु युवती आणि महिला यांचे जीवन उद्ध्वस्त होते. समाजाची दिशाभूल होऊन जिहादी आतंकवाद्यांना संरक्षण मिळते. या भयानक वास्तवाविषयी कुणी बोलत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. उलट वस्तूस्थिती सांगणार्या चित्रपटांना विरोध होतो. पाकिस्तान हा आतंकवाद्यांचा कारखाना असल्याने पाकचे नेते भारतविरोधी आणि आतंकवादधार्जिणी वक्तव्ये करणार, हे गृहीत धरता येते; मात्र भारतातून त्यांच्या वक्तव्यांचा जाहीर प्रतिवाद केला जात नाही, हे अनाकलनीय आणि चिंताजनक आहे. या षंढ मानसिकतेमुळेच भारतात ‘चित्रपट जिहाद’ फोफावला आहे.
चित्रपटांतून वस्तूस्थितीच मांडली जावी !
आतंकवादावर यापूर्वीही भारतात अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत; मात्र अनेक चित्रपटांतून ‘आतंकवाद हा आतंकवाद असतो, त्याला कोणता धर्म नसतो’, अशी मखलाशी केली जाते. खरे तर आतंकवादी विचारसरणीचे उगमस्थान कुठे आहे ? हे जगजाहीर आहे. असे असतांनाही जिहादी धर्र्मांधांच्या विचारसरणीला तथाकथित मागासलेपणाचा, तसेच अन्यायग्रस्त परिस्थितीचा मुलामा देऊन सकारात्मकतेने प्रस्तुत केले जाते. यामुळे थोड्या-फार लोकांच्या मनात आतंकवादाविषयी चीड निर्माण होते; परंतु आतंकवादाचे मूळ कारण बाजूला ठेवून ही समस्या वेगळ्याच दिशेने प्रस्तुत केल्यामुळे लोकांच्या मनातील चीड वस्तूनिष्ठ ठरत नाही. असे नागरिक वैचारिक गोंधळात जगतात. हे वातावरण आतंकवाद वाढण्यास पोषक आणि आतंकवादाच्या विरोधात जागृती होण्यास बाधक ठरते. अनेक जिहादी आतंकवादी कारवायांत सुशिक्षित धर्मांधांनाही पकडण्यात आले आहे. यातून ‘निरक्षरता आणि पायाभूत सुविधांचा अभाव यांमुळे आतंकवादी निर्माण होतात’, या विधानातील फोलपणा उघड होतो. चित्रपटांतून निर्माण केल्या गेलेल्या आभासी जगामुळे लोकांपर्यंत ही वस्तूस्थिती पोचत नाही. यात प्रसारमाध्यमे भर घालतात. चित्रपटांच्या कथानकांचे वृत्त देतांना सर्वधर्मसमभावाचे भरभरून गोडवे गायले जातात. भारतीय जनता, विशेषत: भारतातील हिंदू सत्य परिस्थितीपासून मात्र अनभिज्ञ रहातात; कारण जिहादी आतंकवादाचे सत्य स्वरूप हिंदूंच्या समोर येऊच दिले जात नाही. त्यामुळे हिंदु जनमानसांत निवळ आतंकवादाच्या विरोधात जागृती करणे पुरेसे नाही, तर आतंकवाद म्हणजेच ‘जिहादी आतंकवाद’ असून त्याचे पोशिंदा कोण आहेत ? हे उघड सत्य मांडण्याची धडाडी हवी, मग ते चित्रपट असोत वा प्रसारमाध्यमे !
सरकारने कठोर भूमिका घ्यावी !
समाजमन घडण्यात सरकारी भूमिकेचा मोठा वाटा असतो. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने लांगूलचालनाचे धोरण स्वीकारल्याने समाजात सर्व प्रकारच्या जिहादी कारवायांची पाळेमुळे पसरली. ती उखडून टाकण्यासाठी आताच्या राष्ट्रप्रेमी सरकारला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. आतंकवाद्यांवर सैनिकी कारवाई तर व्हायलाच हवी, त्यासह जिहादी धर्मांधतेविषयी वस्तूजन्य स्थिती सांगणारे चित्रपट निर्माण होण्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे, हेच ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या निमित्ताने राष्ट्रप्रेमी नागरिकांचे सांगणे आहे !