मिरज येथील हिंदु धर्मशाळेत अकारण उच्छाद माजवणार्या व्यसनाधीन समाजकंटकांचा बंदोबस्त करा !
बजरंग दलाचे गांधी चौक पोलीस ठाण्यात निवेदन
हिंदु धर्मशाळेत समाजकंटकांनी उच्छाद माजवणे हे कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचे लक्षण ! – संपादक
मिरज, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – गेल्या काही मासांपासून गांधी चौक येथील हिंदु धर्मशाळेत काही व्यसनाधीन समाजकंटकांकडून तेथे रहाणारे रुग्ण-नातेवाईक यांना अकारण त्रास दिला जातो. विनाअनुमती धर्मशाळेत प्रवेश करणे, आरडाओरडा करून दहशत माजवणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे येथे उपचारांसाठी रहाणारे रुग्ण आणि विशेषत: महिलांमध्ये भीती आहे. हिंदु धर्मशाळेत उच्छाद माजवणार्या व्यसनाधीन समाजकंटकांचा बंदोबस्त करावा, या मागणीचे निवेदन बजरंग दलाच्या वतीने २५ नोव्हेंबर या दिवशी गांधी चौक पोलीस ठाण्यात देण्यात आले.