भारताची प्रतिष्ठा असलेली संस्कृत भाषा आणि संस्कृती वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक !

पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार

पू. तनुजा ठाकूर

‘स्वातंत्र्यानंतर आपल्या शासनकर्त्यांनी या देशाची प्रतिष्ठा वाचवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. शास्त्र सांगते, ‘भारतस्य प्रतिष्ठे द्वे संस्कृतं संस्कृतिस्तथा ।’ म्हणजे ‘भारताच्या दोन प्रतिष्ठा आहेत, एक संस्कृत भाषा आणि दुसरी संस्कृती.’ या देशातील शासनकर्त्यांनी षड्यंत्राद्वारे संस्कृत भाषेला जनतेपासून दूर ठेवले, हे सर्वश्रुत आहे; कारण त्यांना माहीत होते की, भारतीय संस्कृतीचे ज्ञान संस्कृतविना अशक्य आहे. त्यामुळे शासनकर्त्यांनी हा आधारच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि आज स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही ही सुसंस्कृत भाषा बुद्धीजिवींमध्ये सुद्धा बोलली जात नाही किंवा ती समजून घेतली जात नाही. शासनकर्ते पाश्चात्त्यवादामुळे आणि मुसलमानांचे तुष्टीकरण करण्यासाठी या दैवी वैदिक संस्कृतीला नष्ट करत आहेत. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य झाले आहे. हिंदु राष्ट्रात संस्कृत भाषा आणि वैदिक संस्कृती यांना राजाश्रय मिळेल अन् त्यांचे संवर्धन होईल.’

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापक, वैदिक उपासनापीठ (१७.११.२०२१)