आनंदी, कष्टाळू आणि प्रेमभाव असलेल्या कोल्हापूर येथील सौ. विजया बाळासाहेब निंबाळकर !
आनंदी, कष्टाळू आणि प्रेमभाव असलेल्या उंचगाव (कोल्हापूर) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. विजया बाळासाहेब निंबाळकर (वय ६७ वर्षे) !
१. आनंदी
‘सौ. विजया सतत आनंदी आणि हसतमुख असते. ती प्रत्येकाच्या आनंदात सहभागी होते.
२. कष्टाळू
विजयाचा विवाह झाला असतांना तिच्या घरची आर्थिक स्थिती बेताची होती. मुलगा (वय ७ वर्षर्े) आणि मुलगी (वय ४ वर्षर्े) शाळेत जायला लागल्यावर तिने बालवाडीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तिने वर्ष १९८८ पासून बालवाडी अन् अंगणवाडी वर्ग चालू केले. ती ‘कपडे शिवणे आणि घरात लहान मुलांची शिकवणी घेणे’, आदी कामे अत्यंत प्रामाणिकपणे करत होती.
३. धाडसी
तिला सर्वांसमोर एखाद्या विषयावर विचार मांडायला सांगितले, तर ती पूर्वसिद्धतेविना सूत्रे सांगू शकते.
४. ती स्वतः पैसे कमावत होती, तरी ती सर्व वेतन यजमानांकडे द्यायची. तिला कुठे जायचे असल्यास ती यजमानांकडून आवश्यक तेवढेच पैसे मागून घ्यायची.
५. प्रेमभाव
अ. ती घरी आलेल्या व्यक्तींचे प्रेमाने स्वागत करून आदरातिथ्य करते.
आ. तिला तिच्या सुनेकडून कोणत्याही अपेक्षा नसतात. ती सुनेला मुलीप्रमाणे वागवते आणि तिचे कौतुक करते.
इ. ती शेजारी, नातेवाईक आणि साधक या सर्वांना साहाय्य करते.
६. कर्तव्यांचे पालन करणे
अ. आमचे माहेरचे कुटुंब मोठे आहे. ती नातेवाइकांच्या घरच्या समारंभात आनंदाने सहभागी होते आणि त्यांना आवश्यक ते साहाय्य करते.
आ. कुणी रुग्णाईत असल्यास किंवा कुणाला अडचण असल्यास ती आवश्यक ते साहाय्य करते. मी रुग्णाईत असतांना ती रात्री रुग्णालयात थांबली होती.
इ. माझ्या मुलाच्या (श्री. मिलिंदच्या) विवाहाच्या वेळी तिने आणि तिच्या कुटुंबाने आम्हाला मुलगी पहाण्यापासून ते साखरपुडा, कपडे खरेदी, भेटवस्तूंची बांधणी, आमंत्रण देणे-घेणे, धान्याची खरेदी, घरकामात साहाय्य करणे असे सर्व सहकार्य केले. तेव्हा त्यांनी ‘एका साधकाच्या घरी सेवा करत आहोत’, असा भाव ठेवला होता.
७. अपेक्षा नसणे
कठीण परिस्थितीतही तिने तिच्या एकुलत्या एक मुलाला (सागरला) सनातन संस्थेत पूर्णवेळ सेवा करण्यासाठी पाठवले. तिने भविष्याचा विचार न करता सागरला साधनेसाठी प्रोत्साहन दिले. तेव्हा आम्ही भावंडे तिला पुष्कळ रागावलो, तरी ती डगमगली नाही. आता आमचे सर्व कुटुंबच साधनारत आहे.
८. श्रद्धा
तिची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ श्रद्धा आहे.
‘हे गुरुमाऊली, निंबाळकर कुटुंबियांमुळे मीही साधनेत आले आहे. माझ्या बहिणीची पुढील आध्यात्मिक उन्नती आपणच करवून घेणार आहात. ‘तिच्यातील गुण माझ्यातही येऊ देत आणि माझ्याकडून साधनेचे प्रयत्न होऊ देत’, अशी प्रार्थना करून मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. कल्पना मारुति पाटील (लहान बहीण), मु.पो. अत्याळ, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. (२८.१.२०२०)